नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आईच्या संपत्तीवर डोळा ठेऊन ती परस्पर ताब्यात घेणे मुलगा व सुनेला चांगलेच महागात पडले आहे. वृध्द आईने थेट पोलिस स्थानकातच आपल्या मुलासह सुने विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सुरक्षा रक्षकाकडून परस्पर चावी घेत या दांम्पत्याने सदनिकेवर कब्जा केला. त्यामुळे वृध्द आई संतापली व तीने थेट पोलिस स्थानकच गाठले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिपाल हरिश्चंद्र भादू आणि प्रिती महिपाल भादू अशी सदनिकेवर कब्जा करणा-या संशयित दांम्पत्याची नावे आहेत. याबाबत रत्ना भादू (रा.विसेमळा,कॉलेजरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. रत्ना भादू यांच्या मालकिची गंगापूररोडवरील पंपीगस्टेशन येथील आनंदमय सोसायटीत सदनिका आहे.
या सदनिकेत गेल्या शुक्रवारी (दि.१०) संशयितांनी अनधिकृतपणे प्रवेश करून सामान ठेवून कब्जा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रत्ना भादू यांच्या नावे असलेल्या फ्लॅटची संशयितांनी परस्पर सोसायटीच्या वॉचमनकडून चावी घेवून हा कब्जा असून अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten