नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाअगोदरच बाळ जन्माला आल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून परिचीताने तरूणीवर बलात्कार केला. त्यानंतर या तरुणीने एका गोंडस बाळास जन्म दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून संशयितास अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समशेर मुस्ताक अली शहा (रा.संजीवनगर,अंबड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यातून ही घटना घडली.
संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून गेली चार वर्ष तरूणीवर बलात्कार केला. यातून युवती गर्भवती राहून तिने मुलास जन्म दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten