नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागातून दोन अॅटोरिक्षासह चार मोटारसायकली चोरट्यांनी चोरुन नेल्या. याप्रकरणी अंबड, नाशिकरोड ,आडगाव,भद्रकाली व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यात वाहनाचोरीचे प्रमाण वाढले आहे.
नांदगाव येथील मिनीहाज रहेमान शेख यांच्या मालकिची अॅटोरिक्षा एमएच १५ एके ६५९८ गेल्या शुक्रवारी (दि.५) रात्री मित्र संजय बाबुलाल घुले (रा.सहारा हॉटेल मागे,सुभाषरोड) यांच्या घराबाहेर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात घडली. याबाबत किशोर गुलाब मोरे (रा.चुंचाळे) यांनी फिर्याद दिली आहे. मोरे यांची रिक्षा एमएच १५ एके ५१७५ गेल्या बुधवारी रात्री त्यांच्या घरकुल योजना परिसरातील बिल्डींग नं.६ च्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. तिस-या घटनेत सागर आनंदा वाघ (रा. डीजीपीनगर नं. २) यांनी फिर्याद दिली आहे. वाघ यांची एमएच १५ जेएल ८९१५ दुचाकी गेल्या सोमवारी (दि.८) रात्री केवलपार्क येथील अमृत विहार अपार्टमेंट येथे पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील व हवालदार टोपले करीत आहेत.
चौथी घटना महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात घडली. याबाबत संदिप बाबुराव पाटील (रा.औदुंबरनगर,अमृतधाम) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांची अॅक्टीव्हा एमएच १५ जीटी ६४०३ गेल्या शुक्रवारी (दि.५) जत्रा हॉटेल परिसरातील चेतन वाईन शॉप समोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुरंजे करीत आहेत.
पाचवी घटना कान्हेरेवाडी भागात घडली. याबाबत पुष्कर मुकूंद जाधव (रा.अश्विननगर,सिडको) या युवकाने फिर्याद दिली आहे. जाधव यांची पॅशन प्लस दुचाकी एमएच १५ बीवाय १०३ बुधवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास सिबीएस बसस्थानक नजीकच्या कान्हेरेवाडी भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक निंबाळकर करीत आहेत. तर अनिल बाळासाहेब पाटणकर (रा.दिपमाला अपा.सावरकरनगर) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ ईटी १२७९ गेल्या गुरूवारी (दि.४) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.