नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भद्रकाली परिसरात गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये भद्रकाली परिसरात दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाली. या हाणामारीत एक एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन्ही तरुण मद्यधुंद अवस्थेत मिरवणूक बघायला आले होते. त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी एकमेकांची डोकी फोडली.
ही हाणामारी चालु असतांनाच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. ऐन मिरवणूक सुरु असताना झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असतांना सर्व शांततेत सुरु असतांना ही घटना घडली.
सकाळी शहरातील वाकडी बारव येथून गणेश विसर्जन मिरवणुकाला सुरवात झाली. भद्रकाली परिसरात मिरवणूक आली असताना दोन तरुणांची हाणामारी झाली. या हाणामारीत एकाच्या डोक्याला जबर मार लागला. तो रकताच्या थारोळ्यात खाली पडला होता. ही हाणामारी वादामुळे झाली असली तरी या वादाचा काय कारण होते हे स्पष्ट होऊ शकले नाही, या दोघांची ओळखही पटलेली नाही.