नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५० हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना कामटवाडा भागात घडली.या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणेही चोरुन नेले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम रमेशचंद्र अग्रवाल (२९ रा.लंबोधर क्लासिक अपा.कार्तिकेय नगर,कामटवाडा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अग्रवाल कुटुंबिय शुक्रवारी (दि.३) सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ४८ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten