नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १७ वर्षीय मुलीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात घडली. बसरा इमरान खान (१७ रा.गोरोबा मंदिराजवळ चुंचाळेगाव) असे मृत युवतीचे नाव आहे.
बसराच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बसरा खान हिने शुक्रवारी (दि.३) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता.
ही बाब निदर्शनास येताच बहिणी सादिया खान यांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten