नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पेठरोडवरील मनोज अंबादास भोये (रा.गंगाधाम अपा.कंसारा नगर,इंद्रप्रस्थ कॉलनी) यांची एमएच १५ बीआर ४२१४ दुचाकी गेल्या २६ ऑक्टोंबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. संगिता विजय सोनवणे (रा.तपानी निवास दामोधरनगर,पाथर्डीफाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
सोनवणे यांची प्लेझर एमएच १५ एचटी ४७३५ गेल्या रविवारी (दि.२९) रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बेजेकर करीत आहेत.
साडे सहा हजार रूपये किमतीचा गुटखा जप्त
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात प्रतिबंधीत गुटख्याची विक्री करणा-या एकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत सुमारे साडे सहा हजार रूपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुकर तोमर मुल्य (६३ रा.फेमवंदन सोसा.शिवकॉलनी वडाळा पाथर्डी रोड) असे संशयित गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळील देवीप्रसाद हॉटेल भागात एक जण गुटखा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१) इंदिरानगर पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडतीत विमल,हिरा,राजनिवास,आरएमडी नामक गुटख्याचे पुडे मिळून आले. संशयितांस अटक करीत त्याच्या ताब्यातील सुमारे ६ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे. अधिक तपास जमादार माळी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten