नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मंगळवारी वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी नाशिकरोड व इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना नाशिकरोड येथे घडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा भागात राहणारे महेश रमनलाल कलंत्री (रा.मनकोडी मेशन बिल्डींग ना.रोड) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ डीबी ४३७७ मंगळवारी रात्री त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.
दुस-या घटनेत राजीवनगर येथील प्रसाद चंद्रकांत पवार (रा. सुयश अपा.सुमन पेट्रोलपंपाचे मागे,वनवैभव कॉलनी) यांची पल्सर एमएच १५ जीबी १३६७ मंगळवारी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten