नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घनकर गल्लीत गरबा खेळण्यास नकार दिल्याने दोन जणांनी तरुणांवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पवन अनिल जाधव (३२ रा.नीलगंगा अपा.अशोकस्तंभ) यांनी तक्रार दाखल केली आहे. विनीत केदार,स्वामी व त्याचे दोन साथीदार अशी संशयिताची नावे आहेत. जाधव मंगळवारी (दि.२४) घनकर गल्लीत गरबा बघण्यासाठी गेले असता ही घटना घडली. पडक्या वाड्या जवळ ते गरबा रास बघत असतांना संशयितांनी त्यांना गरबा खेळण्याचा आग्रह धरला.
मात्र जाधव यांनी नकार दिल्याने संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना मारहाण केली. यावेळी एकाने धारदार शस्त्राने वार केल्याने जाधव जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुरवाडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten