नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ९० लाख रुपये घेऊन नऊ वर्ष उलटूनही एका दांम्पत्याने जमिनीची खरेदी न देता फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने गुंतवणुकदाराने पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हा गु्न्हा दाखल केला.
या फसवूक प्रकरणी जेम्स प्रसाद वरसाला (३६ रा. आनंदनगर,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पदमाकर घुमरे व सुनिता घुमरे – भंडारे अशी या व्यवहारात गंडा घालणा-या संशयित दांम्पत्याचे नाव आहे. तक्रारदार वरसाला व घुमरे दांम्पत्य एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात २०१४ मध्ये हा व्यवहार झाला होता. घुमरे दांम्पत्याने वरसाला यांचा विश्वास संपादन करून वाडिव-हे जवळील अकरा एकर जमिन खरेदी करून देतो अशी बतावणी केली होती.
त्यानुसार जमिन पसंती नंतर २ मे ते ३० सप्टेंबर दरम्यान ९० लाख रूपयांची रोकड बँकेतून काढून देत अदा करण्यात आली. मात्र नऊ वर्ष उलटूनही संबधीतांनी जमिनीची खरेदी करून दिली नाही. या व्यवहारापोटी दिलेल्या रकमेचा स्व:ताच्या फायद्यासाठी वापर करून फसवणुक केल्याचे निदर्शनास आल्याने वरसाला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली होती. त्यानंतर हा गुन्हा गंगापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र बैसाणे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten