नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपनगर नाका भागात भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गेली तीन दिवस जखमी दुचाकीस्वारावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सैबाज अलताफ शेख (२९ रा.म.गांधी धाम करण हॉल जवळ,शेख मंजील देवळाली गाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सैबाज शेख गेल्या शुक्रवारी (दि.२०) आंबेडकरनगर कडून नाशिकरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर जात असतांना हा अपघात जाला होता. उपनगर नाका येथील आर्मी गेट समोर पाठीमागून भरधाव येणाºया डी.डी. ०१ केजी १११६ या मालट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात शेख गंभीर जखमी झाला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता सोमवारी (दि.२३) उपचार सुरू असतांना डॉ. विशाल कुसारे यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.
२६ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रांतीनगर भागात राहणा-या २६ वर्षीय तरूणाने सोमवारी (दि.२३) आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेमंत कडू पगार (रा.लक्षरंग सोसा.सिध्दीविनायक मंगल कार्यालयासमोर) असे मृत तरूणाचे नाव आहे. हेमंत पगार याने सोमवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मित्र विशाल खिची याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत सिव्हील चौकीचे हवालदार जगताप यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.