नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या पाच जणांनी रविवारी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहे. या आत्महत्येमध्ये दोन महिलांसह एका तरूणाचा समावेश आहे. याबाबत आडगाव, अंबड, म्हसरूळ, नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना माडसांगवी येथे घडली. सुरेश किसन पेटारे (४५ रा.भवानीचा मळा, शिंगाडे वस्ती,माडसांगवी) यांनी रविवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहते घराच्या लोखंडी पाईपाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रघूनाथ गोडसे यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
दुसरी घटना देवळाली गावात घडली. अशोक दामू सुरवाडे (५२ रा.खोले मळा,रोकडोबावाडी) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये छताच्या लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नंदू सोमवाशी यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.
तिस-या घटनेत पळसे येथे यशोदाबाई किसन थोरात (७५ रा.गायकेमळा,बंगालीबाबा) यांचा रविवारी सायंकाळच्या सुमारास परिसरातील सामुहिक विहीरीत मृतदेह आढळून आला. दुर्धर आजाराने पीडित असल्याने व मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी नैराश्यातून विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचा संशय असून, याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.
चौथी घटना सिडकोत घडली. येथील मधुमती विश्वनाथ चौधरी (३९ रा.हेमांद्री अपा.कामटवाडे) यांनी रविवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच भाऊ गणेश गाजरे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत हवालदार जगताप यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.
पाचवी घटना म्हसरूळ शिवारात घडली. गणेश राजू सर्जेराव (२७ रा. पार्वती निवास जवळ,पुष्पकनगर) या युवकाने रविवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून परिसरातील कनसरामाता चौक येथील मोकळ््या प्लॉटमध्ये असलेल्या बाभळीचे झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत राजाराम भोये यांनी दिलेल्या खबरीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जगताप करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten