नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा येथील मॅकडॉनल्ड परिसरातील सर्व्हीसरोडवर भरधाव मालवाहू पिकअपने रस्त्यावर फुलविक्री करणा-या विक्रेत्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली.यात ६० वर्षीय वृध्देचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिलांसह एक जण जखमी झाला आहे. मंदाबाई गंगाधर आष्टीकर (६०, रा.माऊडन ह्यू अपा. पाथर्डी फाटा) असे मृत वृध्देचे नाव आहे. तर बबीता भगवान बदरंगे,रतनबाई पोपट वाघचौरे व भिकन रामदास पाखले हे फुलविक्रीते या अपघातात जखमी झाले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिकअपचालकास चोप देत नागरीकांनी पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला व जखमी शनिवारी (दि.२१) पाथर्डी फाट्यावरील उड्डाणपूल भागात रस्त्यालगत साईडपट्टीच्याखाली नेहमीप्रमाणे फुलांचे गाठोडे घेऊन फुले विक्री करत असतांना हा अपघात झाला. वासन शोरूमकडून भरधाव येणा-या पिकअपने (एम.एच१८ बी. झेड ०८३३) रस्त्याच्या कडेला फुलविक्री करणा-या विक्रेत्यांना चिरडले. वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
यात मंदाबाई आष्टीकर यांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरीत विक्रेते गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर धाव घेत स्थानिकांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. यावेळी जमलेल्या जमावाने चालकास चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले असून याप्रकरणी हवालदास सुधाकर गोसावी यांनी दिलेल्या खबरीवरून चालक किरण राजेंद्र गोसावी (२२ रा.कोकणीपाडा जि.नंदूरबार) याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten