नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूराजे नगर अजिंक्य व्हिलेज परिसरात पार्क करण्यात आलेली दुचाकी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला आहे.
सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. याअगोदरही शहरात समाजकंटकाकडून वाहने जाळण्याचे प्रकार घडले आहे. अशा घटनेमुळे दहशत तयार करण्याचा उद्देश असतो.
दुचाकी जाळून केलेल्या या कृत्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती तयार होते. अशा समाजकंटकांनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान या घटनेचा पोलसी कसून शोध घेत आहे.