नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाईम श्रीदेवी व मिलन नावाचा जुगार खेळणे या तीन जणांना चांगलेच महागात पडले आहे. हे जुगार खेळत असतांना पोलिसांचा छापा पडला व कारवाई झाली. कामटवाडा रोड भागात उघड्यावर हे तीन्ही जुगार खेळत होते. पोलिसांनी या संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली.
निलेश भालंचद्र कोठावदे (रा.इंद्रनगरी,कामठवाडा), प्रविण राजेंद्र अहिरराव (रा.शिवशक्तीचौक,सिडको) व देवधर गणेश दाणी (रा.त्रिमुर्ती चौक,सिडको) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. कामठवाडा रोडवरील इंदुराई पार्क भागात काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पथकाचे भगवान जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता श्रावणी स्नॅक्स सेंटर समोरील मोकळया मैदाणावर संशयित टाईम श्रीदेवी व मिलन नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ३ हजार ८०० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संशयितांना मुद्देमालासह अंबड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी,दिलीप बोई,जमादार सगळे,हवालदार किशोर रोकडे,भदाणे,पोलिस नाईक मंगेश जगझाप,योगेश चव्हाण,भुषण सोनवणे अंमलदार भगवान जाधव,जुंद्रे व सविता कदम आदींच्या पथकाने केली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten