नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदिनी नदीपात्रातील पाण्यात बुडून ६६ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे. सुरेश तुळशीराम वटाणे (रा.म्हाडा बिल्डींग,गिताईनगर झोपडपट्टी टाकळीरोड) असे मृत वृध्दाचे नाव आहे.
ही घटना गिताईनगर भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वटाणे गुरूवारी (दि.१९) नेहमीप्रमाणे रामदास स्वामी मठ भागात गेले होते. नंदिनी नदी पात्रातील पाण्यात तरंगतांना त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबत मुलगा रामदास वटाणे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार राबडीया करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten