नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सदनिकेचा ताबा न दिल्याने नामांकित बिल्डर विरोधात महिला ग्राहकाने पोलिसात स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वर्षापूर्वी ठरलेल्या व्यवहारात रक्कम अदा करूनही फ्लॅटचा ताबा न दिल्याने महिले पोलिस स्थानकात धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप संकलेचा व पुनीत संकलेचा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बांधकाम व्यावसायीकांची नावे आहेत. संशयितांची श्री संकलेचा बिल्डर्स नावाची नामांकित फर्म आहे. याप्रकरणी रिना संतोष पांडे (रा.मनमाड ता.नांदगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. पांडे यांनी सन.२०१६ मध्ये संशयितांच्या वॉटरवेज या साईडमध्ये सदनिका बुक केली होती.
फ्लॅट क्र. ४०२ ही सदनिका पसंत करीत पांडे यांनी या व्यवहारापोटी ठरलेली २८ लाख ४२ हजार ७०० रूपयांची रोकड अदा करूनही इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नाही. तसेच फ्लॅटचा ताबाही दिला नाही. गेली आठ वर्ष पाठपुरावा करूनही बिल्डरकडून दखल घेतली जात नसल्याने पांडे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten