नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड परिसरातील कॅनलरोड भागात धारदार कोयत्याचा धाक दाखवित दहशत निर्माण करणा-या एकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेखर प्रकाश आहिरे (३५ रा.श्रमिकनगर,कॅनलरोड) असे अटक करण्यात आलेल्या कोयताधारीचे नाव आहे. श्रमिकनगर येथील योगेश किराणा दुकान परिसरात एक तरूण कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार बुधवारी (दि.१८) सायंकाळी धाव घेत संशयितास जेरबंद केले असता त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला. कोयता हस्तगत करीत पोलिसांनी संशयितास अटक केली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten