नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंजमाळ भागात गॅस एजन्सीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सिलेंडरच्या पाच टाक्या चोरून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल सुंदरलाल शहा (रा.चंद्रनगर सोसा.कामगार न्यायालयासमोर, गंजमाळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
शहा यांचा गॅस वितरणाचा व्यवसाय आहे. गंजमाळ भागात त्यांची मयूर नावाची गॅस वितरणाची एजन्सी आहे. मंगळवारी (दि.१७) रात्री काम आटोपून ते कार्यालय बंद करून आपल्या घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद एजन्सी कार्यालयाचे कुलूप तोडून सुमारे २१ हजार रूपये किमतीच्या गॅसने भरलेल्या पाच सिलेंडर टाक्या चोरून नेल्या. अधिक तपास पोलिस नाईक ढमाले करीत आहेत.
…….
चोरट्यांनी लॅपटॉप बॅग चोरून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा उघड्या घरात शिरून चोरट्यांनी लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉप व वाहनांची कागदपत्र असा सुमारे २० हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्वेश विनोद पाटील (२१ रा.रिध्दी सिध्दी अपा.शिंदे मळा,अशोकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पाटील कुटुंबिय बुधवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात प्रवेश करीत हॉलमधील टेबलावर ठेवलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉप व वाहनांची कागदपत्र असा सुमारे २० हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten