नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हॉटेलमध्ये चालणारा हुक्का पार्लरचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. म्हसरूळ आडगाव लिंकरोडवरील या हॅाटेलवर ही कारवाई केली. या कारवाईत बेकायदा मद्यासह हुक्काचे साहित्य असा सुमारे साडे सात हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात हॉटेल मालकासह अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ संजय देशमुख (रा.देशमुख वस्ती,म्हसरूळ आडगाव लिंकरोड) व सुरेंन्दर प्रेमसिंद धामी (रा. म्हसरूळ आडगाव लिंकरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. आडगाव – म्हसरूळ लिंकरोडवरील हॉटेल कॅटल हाऊस येते बेकायदा मद्यविक्रीसह हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१८) म्हसरूळ पोलिसांनी छापा टाकला असता संशयितांनी आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी मद्यासह हुक्कापार्लरची व्यवस्था केल्याचे आढळून आले.
या ठिकाणाहून बिअर बाटल्यांच्या खोक्यांसह हुक्का ओढण्याचे साहित्य सुगंधी तंबाखूचे पाकिटे असा सुमारे ७ हजार ४६० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस नाईक पंकज चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten