नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावात आर्थिक देवाण घेवाणीतून टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉड व शस्त्राने मारहाण करण्यात आल्याने ३७ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ चार जणांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे.
लखन बहेनवाल,सचिन उर्फ बुट्या बहेनवाल,शुभम बहेनवाल व रूतिक पारच्या (रा.सर्व साठेनगर,देवळाली गाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून विशाल बहेनवाल हा त्यांचा साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी रवि रमेश कल्याणी (रा.गांधीधाम,देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेत विक्की रमेश कल्याणी (३७ रा. एनएमसी क्वॉर्टर,गांधीधाम) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विक्की कल्याणी व संशयितांमध्ये आर्थिक व्यवहार असून, सोमवारी (दि.१६) रात्री तो साठेनगर भागात गेला असता ही घटना घडली. संशयित टोळक्याने त्यास गाठून घेतलेले पैसे परत का केले नाहीत या कारणातून वाद घालत त्यास बेदम मारहाण केली. या घटनेत लोखंडी रॉड व धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने कल्याणी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten