नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही विनापरवानगी शहरात वावर ठेवणा-या दोघा गावगुंडाना मंगळवारी (दि.१७) वेगवेगळया भागात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी नाशिकरोड व भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमुळे तडिपारांचा शहरातील वावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पराग उर्फ गोट्या राजेंद्र गायधनी (२७ रा. गायधनी निवास,पुरूषोत्तम शाळेजवळ,जेलरोड) व नईम अब्बास शेख (रा.घर नं. ३६५९ भोईगल्ली,बागवानपुरा भद्रकाली) असे अटक केलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. गोट्या गायधनी याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपारीची कारवाई केलेली आहे. मात्र त्याचा वावर शहरातच होता. मंगळवारी गायधनी कलानगर येथील थोरात पेट्रोलपंप भागात असल्याची माहिती मिळाल्याने नाशिकरोड पोलिसांनी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत पोलिस शिपाई मनोहर कोळी यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी कारवाई शहर गुन्हे शाखेच्या पथकाने द्वारका भागात केली. नईम शेख यास सहा महिन्यांसाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेले असतांना तो मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हॉटेल मथुरा परिसरात मिळून आला. याबाबत गुन्हे शाखेचे दत्तात्रेय चकोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अदिक तपास पोलिस नाईक बाविस्कर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten