नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव शिवारात राहणा-या १८ वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसले तरी त्याने शेअर बाजारात तोटा झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रितेश सोमनाथ माळोदे (रा.एमईटी कॉलेज जवळ,माळोदे मळा) असे मृत युवकाचे नाव आहे. रितेश माळोदे याने गेल्या गुरूवारी (दि.१२) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ पंचवटीतील सुधर्म हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना सोमवारी (दि.१६) डॉ. मृगराज मुर्तडक यांनी त्यास मृत घोषीत केले.
रितेशची शेअर बाजारात मोठी गुंतवणुक असल्याचे कळते. त्यात त्यास तोटा झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten