नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील सर्व्हीसरोडवर धावत्या दुचाकीवरून पडल्याने जखमी झालेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आठवडाभर या महिलेवर उपचार सुरू होते. कमलाबाई दिगंबर त्रिभुवन (रा. पाथर्डीफाटा) असे मृत महिलेचे नाव आहे.याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कमलाबाई त्रिभुवन या गेल्या सोमवारी (दि.९) दुपारच्या सुमारास नातेवाईकाच्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. आडगाव कडून जत्रा हॉटेलच्या दिशेने त्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना महामार्गावरील दर्गा परिसरातील सर्व्हीसरोडवर त्या धावत्या मोटारसायकलवरून चक्कर येवून पडल्या होत्या.
या घटनेत त्यांच्या डोक्यास व हातापायास गंभीर दुखापत झाली होती. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे प्रमोपचार करून आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. कश्यपी मोकाशी यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ. संजय मानेकर यांनी मृत्यूची खबर दिली असून अधिक तपास हवालदार राकेश बनकर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten