नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तडिपारीनंतरही त्याने उपद्रव सुरूच ठेवल्याने गावगुंडाने पोलिसांनी अखेर स्थानबंध्द केले आहे. संशयिताची कॉलेजरोडसह शरणपूररोड,सिडको आणि सिध्दार्थनगर भागात मोठी दहशत आहे. दिलीप विष्णू गायकवाड (२५ रा.सिध्दार्थनगर,बॉईज टाऊन स्कुल समोर) असे स्थानबंध्द करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.
गायकवाड याची सिध्दार्थनगर,कॉलेजरोड,तिबेटीयन मार्केट,शरणपूर आणि सिडको भागात मोठी दहशत आहे. आपली दहशत कायम राहवी यासाठी त्याच्या कडून नागरीकांना धाक दडपशा दाखविणे व शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणे असे प्रकार सुरू होते. यापार्श्वभूमिवर पोलिसांनी त्याच्यावर गेल्या वर्षी हद्दपारीची कारवाई केली होती. मात्र त्याने शहरात वावर ठेवून उपद्रव सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या विरूध्द एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. संशयितास गेल्या शुक्रवारी (दि.१५) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गेल्या नऊ महिन्यातील ही अकरावी एपीडीएची कारवाई आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten