नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नरफाटा परिसरातील अस्वले मळा येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ६२ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल प्रभाकर शेटे (रा.श्री समर्थ रेसि.अस्वले मळा) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. शेटे कुटुंबिय रविवारी (दि.१५) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक आडके करीत आहेत.
दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी केली अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -द्वारका परिसरात धारदार चॉपरचा धाक दाखवून दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार (२२ ) व कल्पेश उर्फ सोनू मनोज झगडे (२२ रा. दोघे कुंभारवाडा,जुने नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.
द्वारका परिसरातील सीमरा ट्रव्हल्स व देशी दुकान परिसरात दोघे धारदार शस्त्राचा धाकदाखवत दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१६) पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडतीत धारदार चॉपर मिळून आला. पथकाने चॉपर हस्तगत केला असून याप्रकरणी अंमलदार सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten