नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फाळके स्मारक परिसरातील शंकरनगर भागात रंग काम करतांना तिस-या मजल्यावरून उडी घेत २९ वर्षीय पेंटरने आत्महत्या केल्याची घटना घडली. राम सुदाम वानखडे (रा. शिरसाठ मळा,सुखदेवनगर पाथर्डी गाव) असे मृत युवकाचे नाव आहे. वानखेडे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वानखेडे सोमवारी (दि.१६) शंकरनगर येथील हॉटेल सुमनचंद्रा जवळील पांडव इन्क्ल्यू या इमारतीच्या तिस-या मजल्यावर रंगकाम करीत होता. तिस-या मजल्यावर पेंटीग काम करीत असतांना अचानक त्याने अज्ञात कारणातून जमिनीवर उडी घेतली होती.
या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यास भाऊ राहूल वानखेडे याने तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. आदित्य कोडपल्ली यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
तडीपार गावगुंडास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही विनापरवानगी शहरात वावर ठेवणा-या गावगुंडास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई नागची चौकात करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत उर्फ दादया नंदू तोरडमल (२२ रा. बजरंगवाडी) असे अटक केलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. तोडरमल याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपारीची कारवाई केलेली आहे. मात्र त्याचा वावर शहरातच होता.
सोमवारी (दि.१६) तोरडमल नागजी चौकात असल्याची माहिती मिळाल्याने मुंबईनाका पोलिसांनी धाव घेत सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. याबाबत पोलिस शिपाई उगले यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten