नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –सीबीएस बसस्थानकात बसमध्ये चढतांना पडल्याने ३७ वर्षीय प्रवाश्याच्या पायावरून एसटीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात बसचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र मधूकर वाघ (रा.नवी शेमळी ता.सटाणा) असे जखमी प्रवाश्याचे नाव आहे.
वाघ गेल्या मंगळवारी (दि.१०) शहरात आले होते. परतीच्या प्रवासासाठी ते सीबीएस बसस्थानकात गेले असता ही घटना घडली. फलटावरून सुटलेल्या एमएच १४ बीटी २३६५ या धावत्या बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. फाटक उघडून ते चढत असतांना अचानक हात निसटल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांच्या डाव्या पायावरून बसचे चाक गेल्याने गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी पोलिस नाईक गांगोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten