नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांवर लंपास केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे मंगळसुत्र आणि अंगठी चोरुन नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत जंयत कुलकर्णी (रा.श्रीओम अपा.अहिल्याबाई होळकर चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी कुटुंबिय गुरूवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र आणि लहाण मुलांची अंगठी असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक बागुल करीत आहेत.
सिडकोत तडीपाराला केली अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही विनापरवानगी शहरात वावर ठेवणा-या गावगुंडास पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई सिडकोतील इंदिरागांधी वसाहतीत करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश विष्णू कु-हाडे (२२ रा. इंदिरागांधी वसाहत क्र.१ शिवाजीचौक सिडको) असे अटक केलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. कु-हाडे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपारीची कारवाई केलेली आहे.
मात्र त्याचा वावर शहरातच होता. शुक्रवारी (दि.१३) रात्री तो आपल्या घरी आलेला असल्याची माहिती मिळाल्याने अंबड पोलिसांनी धाव घेत सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या असून याबाबत पोलिस शिपाई अनिल गावय यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten