नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिडीकामगारनगर भागात मद्याच्या नशेत २६ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. स्व:ताच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याने ही घटना घडली असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश बाळू चौरे (रा.फुलेनगर,बिडी कामगारनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
सुरेश चौरे याने शुक्रवारी (दि.१३) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी दारूच्या नशेत स्व:ताच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. या घटनेत तो ५० टक्के भाजल्याने स्थानिकांच्या मदतीने बहिणीने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान डॉ.शुभम ब्राम्हे यांनी मृत घोषीत केले. याबाबत हवालदार जगताप यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणारा पोलिसांच्या जाळयात
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धारदार तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणारा पोलिसांच्या जाळयात अडकला. ही कारवाई खुटवडनगर भागात करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनी कन्हैय्यालाल श्रीवास्तव (२६ रा.आहिल्याबाई होळकर चौक,शिवाजी चौक सातपूर) असे संशयित तलवारधारीचे नाव आहे.
आयटीआय ब्रिज भागात एक तरूण धारदार शस्त्राचा धाकदाखवत दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडतीत धारदार लोखंडी तलवार मिळून आली. पथकाने तलवार हस्तगत केली असून याप्रकरणी अंमलदार तुषार मते या फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
……