नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या अकरा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई नाशिकरोड परिसरातील बिटको पॉईट भागात करण्यात आली. उड्डाणपुलाजवळील एमएसईबी कार्यालय नजीकच्या सार्वजनिक शौचालयाच्या आडोशाला गुरूवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास ज्ञानेश्वर एकनाथ जाधव (४८ रा.जगतापमळा,विजयनगर),महुर सुरेश निकम (रा.कॅनलरोड),नितीन शंकर चवटे (रा. साहीशांती नगर,गोरेवाडी),अरबाज इदरीज पठाण (रा.साईनाखनगर ना.रोड),गजानन जगन चव्हाण व सुनिल घनश्याम नुनासे (रा.दोघे बिटको उड्डाणपूलाखाली) आदी पत्यांच्या कॅटवर रम्मी जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ७ हजार ७०० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार अनिल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक हिवाळे करीत आहेत.
दुसरी कारवाई पाथर्डी पिंपळगाव खांब येथे करण्यात आली. येथे झाडाखाली उघड्यावर काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.११) रात्री पोलिसांनी छापा टाकला असता जावेद सलीम पठाण (२८ रा.भिमवाडी झोपडपट्टी,भद्रकाली),संतोष सुरेश मंडलिक (२८ रा.भगतसिंगचौक,लोकमान्यनगर सिडको),संदिप इश्वर सुर्यवंशी (३५ रा.भोळे मंगल कार्यालयासमोर,उत्तमनगर सिडको), सुमित सुधीर साळवे (रा.रमाबाई आंबेडकरनगर,भद्रकाली) व अजय भारत कुमावत (२४ रा.वक्रतुंड कॉलनी,पाथर्डी फाटा) आदी फ्लाईंग कलर इग्लीश मेडियम स्कूल समोरील मोकळ््या जागेतील झाडाखाली पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ७ हजार ६८० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार मुशरिफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.
आत्महत्येचे सत्र सुरूच, तीन जणांनी केली आत्महत्या
नाशिक : शहरात गुरूवारी वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केली. त्यात एका तरूणासह महिला व युवतीचा समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड,देवळाली कॅम्प व नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना नाशिकरोड येथील गोसावीवाडी भागात घडली. कोमल अनंत भारती (२० रा.भारतीमठ,गोसावीवाडी) या युवतीने गुरूवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील खांबास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ अक्षय भारती यांनी तिला तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोत घडली. येथील साधना रविंद्र देवरे (३४ रा.स्वामी विवेकानंद नगर,राणेनगर) यांनी गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला पती कामावरून घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सचिन मोरे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत.
आत्महत्येती तिसरी घटना नाणेगाव ता.जि.नाशिक येथे उघडकीस आला. राकेश सोमनाथ हांडोरे (३० रा.मराठी शालेजवळ,नाणेगाव) यांनी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या हुकाला कपडा बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. याबाबत आनंदा जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten