नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना त्र्यंबकरोडवरील विकास कॉलनीत घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे चोरुन नेले.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमिला रमेश भामरे (रा.स्वप्निल बंगला,विकास कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
१ एप्रिल ते ३१ ऑगष्ट दरम्यान ही घटना घडली. भामरे कुटुंबिय बाहेरगावी असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही घरफोडी केली. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात असलेले सुमारे २ लाख ७८ हजार ३८८ रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten