नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २५ वर्षीय विवाहीतेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हिरावाडीत घडली आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी पती व सासूच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरकडील मंडळीने केला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशांक शरद अहिरे व सुजाता शरद अहिरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मायलेकाचे नाव आहे. याप्रकरणी मृत विवाहीतेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. एकता शशांक अहिरे (रा. केशवनगर) या विवाहीतेने गेल्या रविवारी (दि.१) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पती शशांक अहिरे यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना बुधवारी (दि.११) वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.
दरम्यान तिच्या पालकांनी पती व सासूच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल केली असून दोघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten