नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड परिसरातील दसक येथे भरदिवसा घरफोडत चोरट्यांनी सुमारे ६५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती सुरेश कोष्टी (रा.मारूती पार्क अपा.श्रीकृष्णनगर, दसक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
कोष्टी या मंगळवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहेत.
गर्दीत संधी साधत युवकाचा मोबाईल चोरट्यांनी केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील शिवाजी चौकात भाजीबाजारातील गर्दीची संधी साधत चोरट्यांनी एका युवकाचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार अर्जुन बाबर (रा.अमृतानगर,पाथर्डी) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बाबर मंगळवारी (दि.१०) भाजीपाला खरेदीसाठी शिवाजी चौकात गेला असता ही घटना घडली. गर्दीत खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्याच्या खिशातील महागडा मोबाईल चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten