नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गौळाणे रोड भागातील मार्गावरील एसएसके क्लब भागात व्यावसायीक वृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी लांबविणा-या चोरट्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. टपरीवर सिगारेट खरेदीच्या बहाण्याने थांबून भामट्याने महिलेच्या गळयातील सोनसाखळी लांबविली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय एकनाथ गुळवे (२८ रा.गामणे मैदाणासमोर,म्हाडा वसाहत,इंदिरानगर) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे. याबाबत पुष्पा यादव सावंत (६० रा.वासननगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सावंत यांचा चहा व खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. एसएसके क्लब भागात त्या मंगळवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास आपल्या टपरीवर व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली होती.
सिगारेट खरेदीच्या बहाण्याने आलेल्या संशयित ग्राहकाने आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधत त्यांच्या गळयातील सुमारे ७० हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली होती. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे संशयितास बेड्या ठोकल्या असून उपनिरीक्षक सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten