नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भैरवनाथनगर येथील रेल्वे डाऊन ट्रॅक जवळ रेल्वेची धडक लागल्याने ४२ वर्षीय कामगार ठार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जितेंद्र उर्फ ज्योतीराम तुळशीराम चव्हाण (रा.भैरवनाथ नगर,दर्गा पाठीमागे जेलरोड) असे मृत कामगाराचे नाव आहे. चव्हाण सोमवारी (दि.९) हे एकलहरा येथे कामावर गेले होते. काम आटोपून ते घराकडे परतत असतांना हा अपघात झाला.
डाऊन ट्रॅक परिसरात ते रेल्वे ट्रॅक ओलांडत असतांनाही घटना घडली. डाऊन ट्रॅकवरून येणा-या रेल्वेची धडक बसल्याने ते जखमी झाले होते. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गणेश शिंपी यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.
जुगार खेळणा-या चार जणांवर पोलिसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या चार जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष शिवाजी कापसे,मोहन नारायण शिंदे,रामनाथ पोपटराव गोडसे व बाळू दशरथ कडाळे (रा.सर्व संसरीगाव) अशी संशियत जुगारींची नावे आहेत.
संसरी गाव परिसरातील जुनी स्मशानभूमी भागात काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास धाव घेत छापा टाकला असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकले. संशयित आर्थिक फायद्यासाठी पत्यांच्या कॅटवर जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्यांच्या अंगझडतीत १ हजार २६० रूपयांची रोकड मिळून आली असून या कारवाईत पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten