नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील एका तरुणाला पन्नास करोडची लॉटरी लागल्याची बतावणी करुन सात लाख रूपयांना गंडा घातला. वेगवेगळया शुल्क आकारण्याच्या बहाण्याने गेल्या चार महिन्यात ही रक्कम उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल मुरलीधर मंडलिक (३२ रा.सावरकर चौक,सिडको) या तरूणाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या फेब्रवारी महिन्यात भामट्यांनी मंडलिक यांच्याशी संपर्क साधला होता. पन्नास करोड रूपयांची लॉटरी लागल्याची आमिष दाखवत भामट्यांनी मंडलिक यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी संपर्क साधत भामट्यांनी वेगवेगळी शुल्क आकरणीच्या बहाण्याने मंडलिक यांना टेलिग्राम.स्टेट बँक,कॅनरा बॅक, येस बँकेच्या खात्यात व ९०३२३३१६८३ आणि ९२३३२९२५१२ या मोबाईलधारकांच्या गुगल पे द्वारे पैसे भरण्यास भाग पाडले.
गेल्या चार महिन्यात ७ लाख ७ हजार ५९४ रूपयांची रोकड भरूनही लॉटरीची रक्कम बँक खात्यात जमा न झाल्याने मंडलिक यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten