नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खोडेनगर भागात बाटलीत पेट्रोल दिले नाही या कारणातून चार जणांच्या टोळक्याने पंप कर्मचा-यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत हातातील लोखंडी वस्तू मारण्यात आल्याने कर्मचारी जखमी झाला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार बापू पवार (रा.सारथी सोसा. इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार खोडेनगर येथील आठवण हॉटेल शेजारील देवरे पेट्रोल पंपावर नोकरीस आहेत. शनिवारी (दि.७) रात्री ते आपली सेवा बजावत असतांना ही घटना घडली. दुचाकींवर आलेल्या चार जणांच्या टोळक्याने त्यांच्याकडे प्लॅस्टीक बाटलीत पेट्रोलची मागणी केली.
मात्र बाटलीत पेट्रोल देण्यास मनाई असल्याने पवार यांनी त्यांना नकार दिल्याने ही घटना घडली. संशयित टोळक्याने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाखाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत एकाने हातातील लोखंडी वजनी वस्तूने मारहाण केल्याने पवार जखमी झाले असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten