नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक भागात जुन्या वादातून एकाची दुचाकी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पेश उर्फ सोनू झगडे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून मुन्ना कासार नामक त्याचा साथीदार अद्यापफरार आहे. याबाबत निलम गणपत डमाळे उर्फ निलम लक्ष्मण साबळे (रा.भंडारे बाबा चौक,काझी गढी जुना कुंभारवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या पतीशी संशयितांचा वाद झाला होता. या वादातून ही घटना घडली.
दांम्पत्याचे आर्थिक नुकसान व्हावे या उद्देशाने संशयितांनी रविवारी (दि. ८) घरासमोर पार्क केलेली महिलेची पल्सर दुचाकीवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली. यात मोटारसायकल जळून खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी संशयित झगडे यास अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten