नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर येथील दोन गुंडावर पोलीसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. आकाश भाउसाहेब महाले, वय २१, रा. वाढोली ता. अंबकेश्वर, जि. नाशिक. व संतोष विठ्ठल पालवे, वय ३२, रा. महालक्ष्मी चौक, प्रबुध्दनगर, सातपूर ही दोन नावे कारवाई केलेल्यांची आहे. नाशिक यांनी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत दहशत कायम रहावी यासाठी हे गुन्हेगारी कृत्य करत होते. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या हद्दपार केलेल्या दोघांवर सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे, गैरकायदयाची मंडळी जमवणे, दरोडा, खंडणी मागणे, मारहाण करून जबरी चोरी करणे नुकसान करणे, विटा दगड व लाठयाकठयांनी मारहाण करून दुखापत करणे, अन्यायाने प्रतिबंध करून घातक हत्याराने गंभीर दुखापत करून जबरी चोरी करून नागरिकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत केल्याने त्यांचे विरुध्द पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना खाली, श्रीमती मोनिका नं. राऊत (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, नाशिक शहर) तसेच शेखर देशमुख, (सहाय्यक पोलीसआयुक्त, अंबड विभाग) यांनी या दोघां विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.
नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणा-या व समाज स्वास्थ्य बिघडवणा-या गुन्हेगार इसमांचा गुन्हयांचा अभिलेख संकलित करण्याचे कामकाज चालू असून त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार तडीपार व एमपीडीए कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्तापर्यंत चालू वर्षात परिमंडळ २ हद्दीतून ५५ लोकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आत्तापर्यंत चालू वर्षात परिमंडळ – २ हद्दीत हद्दपार आदेशाचे उल्लंघन करतांना मिळून आले म्हणून एकूण १४ गुन्हेगार इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हद्दपार इसमांना वेळोवेळी चेक करून नाशिक शहर व जिल्हयात सापडल्यास त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरूच राहणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten