नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जया दिवे टोळीतील १४ संशयितांवर पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई केली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजीव सिंगल यांनी मंजुरी दिली आहे. १६ एप्रिल रोजी सिडको भागात वर्चस्वाच्या वादातून सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर या टोळीने गोळीबार केला होता. त्यानंतर पोलीसांनी ही कडक कारवाई केली आहे.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या गुन्ह्यातील संशयितांविरुद्ध मोकान्वये कारवाई करीत, पोलिस महासंचालकांकडे प्रस्ताव पाठविला होता. सिडकोतील बाजीप्रभू चौकात भाजपचा पदाधिकारी व सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गुन्हेगारीच्या वर्चस्ववादातून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता, तसे पोलिस तपासातून समोर आलेले आहे. या गुन्ह्यात शहरातील सराईत गुन्हेगारांची टोळीच सहभागी होती, असेही तपासात निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या १४ जणांवर मोकानुसार कारवाई केली होती.
मोका लावण्यात आलेले संशयित
किरण दत्तू आण्णा शेळके (२९, अंबिका चौक, पंचवटी), जयेश तथा जया हिरामण दिवे (३३ रा. पंचवटी), विकी कीर्ती ठाकूर (२८ रा. दसकगांव नाशिकरोड), गौरव संजय गांगुर्डे (३२ रा. पंचवटी), किरण ज्ञानेश्वर क्षिरसागर (२९ रा. पंचवटी), सचिन पोपट लेवे (२३ रा. क्रांतीनगर), किशोर बाबूराव वाकोडे (२२ रा. कठडा जुने नाशिक), राहुल अजयकुमार गुप्ता (२८ रा. शनि चौक), अविनाश गुलाब रणदिवे (२६ रा. सातपूर), श्रीजय संजय खाडे (२३ रा. जुना आडगाव), जनार्दन खंडू बोडके (२२ रा. पंचवटी), सागर कचरू पवार (२८ रा. गणेशवाडी), पवन दत्तात्रेय पुजारी (२३ रा. तारवालानगर पंचवटी), महेंद्र ऊर्फ गणपत राजेश शिरसाट (२८ वर्षे रा. दत्त चौक पंचवटी)
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten