नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिसांनी पंचवटी कारंजा भागात एका हॉटेल खाली तळमजल्यावर राजरोसपणे सुरू असलेला जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत सात जणांना बेड्या ठोकत पोलिसांनी रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत सत्यवान पाटील,आशिष जामवंत पवार,अमर दयानंद बिराजदार (रा. तिघे मधुबन कॉलनी,पंचवटी),प्रसाद सोमनाथ लभडे (रा.मेनरोड आडगाव), शाम नारायण साहणी (रा.बाबुलाल नर्सरी,जनार्दन स्वामी मठाजवळ,औरंगाबादरोड ) निलेश किसन काकडे (रा.त्रिमुर्ती भवन,हनुमाननगर) व अंकुश बबनराव धोत्रे (रा.चौघुले चाळ,नवनाथनगर) अशी संशयित जुगारींची नावे आहेत.
मानस हॉटेलच्या खाली तळमजल्यावरील एका बंदीस्त खोलीत जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता संशयित अंक अकड्यावर पैसे लावून जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ४ हजार ५७० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस नाईक निलेश भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मिथून परदेशी करीत आहेत.
सातपूरलाही कारवाई
सातपूर शिवारातील साळूंखे नगर भागात टाकलेल्या छाप्यात पाच जुगारी पोलिसांच्या हाती लागले. त्यात कुणाल रविंद्र करोटे (रा.बजरंग चौक,सावतानगर सिडको),संतोष गोविंद मिस्कीन (रा.घुगे चाळ,पंडीतनगर मोरवाडी),विजय उत्तमराव कदम (रा.अष्टविनायक चौक,सावतानगर सिडको),कृष्णा काशिनाथ राऊत (रा.पेठ गल्ली,गंगापूरगाव) व प्रदिप लक्ष्मण पाटील (रा.शिवशक्तीचौक सिडको) आदींचा समावेश आहे. गुरूवारी रात्री संशयित विधातेमळा येथील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला पैसे लावून जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी अंमलदार संभाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गिते करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten