नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इनोव्हा कारच्या झडतीत तब्बल २ लाखाच्या गुटख्याचा साठा आढळून आला. हा साठा पोलिसांना जप्त करुन तीन जणांना अटक केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा जप्त केलेल्या गुटख्याचा तपास करत असतांना राज्यात बंदी असलेला हा गुटखा अहमदनगर जिह्यातून नाशिकमध्ये येत असल्याचे समोर आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केलेल्या कारवाईत ही बाब समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनित रामचंद्र सिंग (२२), सुनिल राजेंद्र प्रताप सिंग (४१ रा.दोघे नेवासा जि.अहमदनगर) व फैय्याज मोहम्मद युसूफ शेख (३९ रा.लेवंडर बिल्डींग,रॉयल कॉलनी रोड नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. नगरमधून इनोव्हाकारमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती.
खब-या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी (दि.३) रात्री मानवता क्युरी हॉस्पिटल भागात सापळा लावला असता संशयितांसह गुटख्याचा साठा पोलिसांच्या हाती लागला. स्टार अॅटो वर्डस गॅरेज समोर थांबलेल्या कारची पथकाने झडती घेतला असता त्यात विविध प्रकारचा सुमारे २ लाख रूपये किमतीचा साठा आढळून आला. संशयितांना बेड्या ठोकत पोलिसांनी कारसह मुद्देमाल जप्त केला असून संशयितांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अंमलदार गुलाब सोनार यांनी दिलेल्या फिर्यादी दाखल केली असून अधिक तपास दत्ता गोडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten