नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विहीतगाव परिसरात दुचाकीस्वारास मारहाण करीत टोळक्याने हॅण्डलला लावलेली बॅग पळवून नेल्याची घटना घडली. या बॅगमध्ये रोकडसह महत्वाचे कागदपत्र असा सुमारे १ लाख ६८ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश बन्सी मरसाळे (४१ रा.विठ्ठल मंदिराजवळ,विहीतगाव) हे सोमवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास विहीतगाव येथील साई लॉन्स समोरून आपल्या इलेक्ट्रीक दुचाकीने घराकडे जात असतांना ही घटना घडली. लॉन्स समोर पाठीमागून आलेल्या कारने दुचाकीस कट मारला. यानंतर चार जणांच्या कार अडवी लावून दुचाकीस लाथ मारून खाली पाडले.
मरसाळे जमिनीवर कोसळताच त्यांच्या डोक्यात काही तरी शस्त्राने प्रहार करण्यात आला. अचानक झालेल्या हल्याने मरसाळे भेदरलेल्या अवस्थेत असतांना संशयितांनी दुचाकीच्या हॅण्डलला लावलेली रोकड व कागदपत्र असलेली बॅग काढून घेत कारमधून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten