नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोकणीपूरा भागात घरासमोर कचरा जाळण्यास विरोध केल्याने संतप्त शेजा-यांनी महिलेसह तिच्या पतीस व सास-यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत महिलेचा विनयभंग करण्यात आला असून तिचा मोबाईलही गहाळ झाल्याची तक्रार पीडीतेने केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अली इम्रान कोकणी,अयान असिफ कोकणी,गुलमगौस रज्जाक कोकणी,इम्रान गुलामगौस कोकणी,गुलजार गुलामगौस कोकणी,रज्जाक गुलामगौस कोकणी,मोईन गुलामगौस कोकणी,फुजेर मोईन कोकणी,हुसैन असिफ कोकणी (रा.सर्व कोकणीपूरा भद्रकाली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
समाज मंदिर भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी (दि.१८) सायंकाळी ही घटना घडली. संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पिडीतेच्या घराजवळ कचरा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेसह तिच्या पतीने व सास-याने विरोध केला असता शेजारी राहणा-या संतप्त संशयितांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत तिघांना लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत तिघे जखमी झाले असून हाणामारीत टोळक्यात पिडीतेचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten