नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोलकरणीचा मालकाच्या घरावर डल्ला मारत ३ लाख ४५ हजाराचे दागिने लंपास केले. धुणी भांडी करण्यासाठी कामावर ठेवलेल्या मोलकणीने कुटुंबियांचे लक्ष नसल्याची संधी साधत ही चोरी केली.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण महेश वाघरी उर्फ डाबी असे संशयित मोलकरणीचे नाव आहे. याप्रकरणी अलका प्रणव जांभेकर (रा.जय व्हिला,स्नेहजीवन कॉलनी कॅनडा कॉर्नर) यांनी तक्रार दाखल केली आहे. जांभेकर यांनी संशयित तरूणीस घरातील धुणी भांडी करण्यासाठी कामास ठेवले होते.
२ ऑगष्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान सदर मुलीने कुटुंबियांचे लक्ष नसल्याची संधी साधत अलंकार लांबविले. भामट्या मुलीने सुमारे ३ लाख ४५ हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten