नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- समतानगर ते उपनगर नाका दरम्यान भरधाव दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरील धडकेत पल्सरस्वार तरूण ठार झाला. या अपघातील दुसरा मोटारसायकलस्वारही जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वतन दादासाहेब पावरा (२२ रा.दौलत बंगला,उपनगर) असे मृत पल्सरस्वाराचे नाव आहे. पावरा शनिवारी (दि.९) रात्री आपल्या पल्सर दुचाकीवर समतानगरकडून उपनगर नाक्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पल्सर आणि युनिकॉर्न या दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दुसरा मोटारसायकल चालकही जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
वाहनाने दिलेल्या धडकेत ३१ वर्षीय पादचारी ठार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३१ वर्षीय पादचारी ठार झाला. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील पळसे गाव परिसरात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यू नोंद करण्यात आला आहे.
दीपक हिरामण खर्डे (रा.प्राईड नेपच्यून,इच्छामणी लॉन्स जवळ,उपनगर) असे मृत पादचाºयाचे नाव आहे. खर्डे रविवारी (दि.१०) रात्री पळसेगावातील युनियन बँकेच्या एटीएम परिसरात पायी जात असतांना नाशिककडून सिन्नरच्या दिशेने भरधाव जाणाºया अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. गंभीर अवस्थेत एमएच १५ सीके ३२९३ वरिल चालक भारत सालकर यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.