नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल जवळ भरधाव दुचाकीवरून पडल्याने ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात झाला होता. चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ही घटना घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश भागवत सोनवणे (रा.मटाले मंगल कार्यालयासमोर,इंद्रनगरी सिडको) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलिस नाईक गणेश घारे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सोनवणे गेल्या २९ नोव्हेंबर रोजी मृत अर्चना राजेंद्र पाटील (३६ रा.चामुंडानगर,अशोकनगर) यांना आपल्या दुचाकीवर डबलसिट घेवून जात असतांना हा अपघात झाला होता. अचानक ब्रेक लावल्याने अर्चना पाटील धावत्या दुचाकीवरून पडल्या होत्या. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten