नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसात इंटरनेटवर पार्ट टाईम शोध घेणा-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहे. या फसवणूकीत लाखो रुपयाला गंडा घातला जात आहे. या फसवणूकीच्या घटनेमुळे सायबर गुन्ह्यातही वाढ झाली आहे. नाशिकमध्ये पुन्हा असाच फसवणूकीचा प्रकार समोर आला असून त्यात एका महिलेला ११ लाख २२ हजार ६४५ रुपयाला गंडा घालण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
इंटरनेवर पार्ट टाईम काम शोधतांना या महिलेची ही फसवणूक झाली आहे. याबाबत वैशाली सोनार (रा.श्रध्दा कॉलनी,इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनार या ३ नोव्हेंबर रोजी इंटरनेवर पार्ट टाईम नोकरीचा शोध घेत होत्या. यावेळी टेलिग्रामच्या माध्यमातून भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. काम देण्याचे आमिष दाखवत त्यांना टास्क देण्यात आला होता.
टास्क पूर्ण करण्यासाठी सोनार यांनी भामट्यांच्या मागणीनुसार टेलिग्राम आयडी,पंजाब नॅशनल बँक,आयसीआयसीआय,एचडीएफसी आणि एस बँक खात्यात पैसे भरले असता ही फसवणुक झाली. सोनार यांना तब्बल ११ लाख २२ हजार ६४५ रूपये भरण्यास भाग पाडले असून, टास्क पूर्ण करूनही भरलेली रक्कम आणि मोबदला न मिळाल्याने त्यांना पोलिसात धाव घेतली आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten