नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भागीदारीतील व्यवसायाच्या बहाण्याने दांम्पत्याने एका परिचीतास सहा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. नफ्यासह गुंतवणुकीची रक्कमही पदरात न पडल्याने तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती पाटील व योगेश पाटील (रा.नरहरीनगर,पाथर्डी शिवार) असे संशयित ठकबाज दांम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक नामदेव पाटील (रा.नरहरीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व संशयित एकाच भागातील रहिवासी असून ते एकमेकांचे परिचीत आहेत. पाटील दांम्पत्याचा प्रिंटीग प्रेसचा व्यवसाय असून त्यांनी गेल्या वर्षी तक्रारदार पाटील यांना गाठून प्रिंटीग प्रेस व्यवसायात चांगला नफा असल्याची सांगून ही फसवणुक केली.
भागीदारीतील व्यवसायाचे आमिष दाखवून दांम्पत्याने एकत्रीत व्यवसाय करू अशी बतावणी करीत तक्रारदार पाटील यांना सहा लाख रूपयांची गुंतवणुक करण्यास भाग पाडले. मात्र वर्ष उलटूनही संशयितांनी नफ्याची व गुंतवणुकीची रक्कम परत न केल्याने तक्रारदार पाटील यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten